news

Breaking: नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश…

Breaking: नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश…

नाशिक (प्रतिनिधी) : एक एकरहून अधिक क्षेत्रावरील बांधकामातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला वर्ग करण्याचा नियम आहे.

नाशिक महापालिकेने त्याचे उल्लंघन करत यासंदर्भात म्हाडाने लिहिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखविली.

🔎 हे वाचलं का?:  युद्धामुळे घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमात महत्त्वाचा बदल… जाणून घ्या सविस्तर…

त्याची विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून चौकशीसह महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत.

म्हाडाच्या नियमानुसार चार हजार चौरस मिटरहून अधिक क्षेत्रावरील बांधकाम प्रकल्पातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल व अन्य घटकांसाठी म्हाडाकडे वर्ग करण्याचा नियम आहे.

मात्र नाशिक महापालिकेत त्याचे उल्लंघन झाले आहे. याबाबत आज विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुचनेवर गंभीर चर्चा झाली. लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री आव्हाड यांनी चौकशीचे आश्‍वासन दिले. सभापती रामराजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्याची घोषणा केली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: रंगपंचमीसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; २ हजार पोलिस, ९०० होमगार्ड तैनात

दरम्यान सभापती निंबाळकर यांनी हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत संबंधितांवर चौकशी अंती कारवाई करण्याबरोबरचं अधिकाऱ्यांच्या तातडीने बदलीच्या सुचना दिल्या. गेल्या आठ वर्षात महापालिकेने दहा घरे देखील हस्तांतरीत न केल्याने बांधकाम व्यावसायिकांना मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला. प्रविण दरेकर यांनी या विषयावर लक्षवेधी भुमिका मांडली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790