नाशिक: मध्यरात्री भरधाव कारच्या धडकेत फूड डिलिव्हरी बॉयचा मृत्यू; त्रिमूर्ती चौकातील घटना…

नाशिक (प्रतिनिधी): थर्टी फर्स्टच्या रात्री डिलिव्हरी देण्यासाठी जात असलेल्या डिलिव्हरी बॉयचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे…

भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने यात फूड डिलेव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नाशिककरांनी यंदा मोठ्या उत्साहात 31 डिसेंबर साजरा केला. या दिवशी हॉटेल्स रिसॉर्ट मोठ्या प्रमाणात बुकिंग होते तर रस्त्यालगतच्या हॉटेल्सला गर्दीचा महापूर होता.

अशातच ऑनलाईन फूडला देखील नाशिककरांनी पसंती दर्शवली. त्या पार्श्वभूमीवर फूड डिलेव्हरी करणाऱ्या कंपन्यांकडून त्या दिवशी नागरीकाकांसह फूड डिलेव्हरी बॉईजला देखील ऑफर्स देण्यात आल्या होत्या.

त्यामुळे अनेक फूड डिलेव्हरी बॉईजने सुट्टी न घेता रात्री उशिरा पर्यंत काम करण्याचा निर्णय घेतला होता. नाशिकमध्ये काम करणाऱ्या सागर याने देखील ऑफर्स असल्याचे पाहून अधिक वेळ काम करण्याचे ठरवले.

👉 हे ही वाचा:  विकसित महाराष्ट्र 2047' सर्वेक्षण: नाशिक जिल्ह्यातील नागरिकांनी 17 जुलैपर्यंत आपले मत नोंदवावे

मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. फूड डिलिव्हरीसाठी जात असताना कारने दुचाकीस धडक दिली. या धडकेत फूड डिलेव्हरी बॉयचा मृत्यू झाला.

सिडकोतील त्रिमूर्ती चौकात झालेल्या या अपघातात फूड डिलिव्हरी बॉय सागर दगा धिवरे (वय: ३३, राहणार: शिवाजीनगर, सातपूर) असे मयत झालेल्या दुचाकी स्वार युवकाचे नाव आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील सिडको त्रिमूर्ती चौकात शनिवारी मध्यरात्री देवरे यांच्या दुचाकीला एका मोटारीने जोरदार धडक दिली.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दिंडोरीरोडवरील मार्केट यार्डात शेतकऱ्याला मारहाण करत लूट

धिवरे हा कॉलेज रोड येथून सिडको त्रिमूर्ती चौकमार्गे पाथर्डी फाट्याकडे दुचाकीने ऑनलाइन फूड पार्सल डिलिव्हरीसाठी जात होता. रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास जात असताना सेलिब्रेशनची नशा चढलेल्या एका कारने (MH 15 GL0685) भरधाव वेगात रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत धडक दिली.

यावेळी दिवरे हे दुचाकीवरून खाली कोसळले. या घटनेत त्यांच्या डोक्याला जवळ दुखापत झाल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मदत घोषित केले.

दरम्यान अंबड पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अपघात ग्रस्त कार सध्या अंबड पोलीस ठाण्यात जमा केली असून पुढील तपास सुरू आहे. धिवरे हे मागील चार वर्षांपासून नियमितपणे फूड डिलिव्हरीचे काम करत आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, तीन वर्षाचा मुलगा, लहान भाऊ असा परिवार आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

त्यांच्या मृत्युनंतर परिसरात तसेच शहरातील ऑनलाईन फूड डिलिव्हरी रायडरच्या ग्रुप मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कारचालका विरुद्ध कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांसह डिलिव्हरी बॉईज कडून होत आहे. धिवरे हा अत्यंत सावधगिरीने व मध्यम गतीने दुचाकी चालवणारा रायडर होता, असे त्याच्या जवळच्या सहकारी मित्रांनी देखील यावेळी सांगितले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790