भावली धरणात अंघोळीसाठी गेलेला युवक गेला वाहून
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरणात रविवारी (२४ जुलै) एक तरुण वाहून गेला आहे.
धरणाच्या बॅकवॉटर मध्ये चार मित्र आंघोळीसाठी गेले असता हि घटना घडली आहे.
इगतपुरी जवळ असणाऱ्या एका बांधकामाच्या साइटवर सुपरवायझर म्हणून सुनील सोनू सांगळे हे काम करत होते.
त्याचे सोबत काम करणारे त्यांचे मित्र सुहास जगताप, ऋषिकेश गावले, दिनेश पंडित यांचे सोबत सांगळे हे इगतपुरी जवळ असलेल्या भावली धरणाच्या बॅकवॉटर मध्ये रविवारी दुपारच्या सुमारास आंघोळ करण्यसाठी गेले होते.
मात्र मित्रांसोबत आंघोळ करत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने सांगळे वाहून गेले. मित्रांनी त्याला वाचवायचा खुप प्रयत्न केला मात्र त्यांना यश आले नाही.. प्रशासनाला माहिती दिल्याने तत्काळ तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने कसारा येथील आपत्ती व्यवस्थापनची टीम आणि इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीचे पथक घटना स्थळी दाखल झाले. धरणात शोधकार्य सुरु केले मात्र सांगळे याचा शोध लागू शकला नाही.