नाशिक: भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दोघा बहिणींना मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड येथील आगर टाकळी येथील वैदुवाडी येथे भांडण सोडविण्यास गेलेल्या दोघा बहिणींना एका संशयिताने मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
वैदुवाडी येथील लता लक्ष्मण शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, रविवारी मध्यरात्री वैदुवाडी येथे संशयित शंकर गुरु लोखंडे हे त्यांच्या घरासमोर कुणाला तरी मारहाण करत होते.
यावेळी लता शिंदे आणि त्यांची बहिण ही शंकर लोखंडे यांना समजावून सांगत असतांना संशयित शंकर लोखंडे याने दोघा बहिणींना लाकडी दंडुक्याने मारहाण केली. तसेच सविता शंकर लोखंडे, साजन गुरु लोखंडे यांनी देखील हाताच्या चापटीने मारहाण करून शिवीगाळ केली असे फिर्यादीत म्हंटले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: मुंबई आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावर ट्रक आणि कंटेनरमध्ये धडक
विभागीय आयुक्तांच्या बंगल्यातील चंदन वृक्षच चोरट्यांनी कापून नेला..