नाशिक: बोलेरोच्या धडकेत १४ वर्षांचा सायकलस्वार मुलगा ठार
नाशिक (प्रतिनिधी): पंचवटीतील जाणता राजा कॉलनीमध्ये भरधाव बोलोरोच्या धडकेत १४ वर्षांचा सायकलस्वार मुलगा ठार झाल्याची घटना घडली.
संशयित वाहनासह पसार झाला.
याप्रकरणी पंचवटी पोलिसात वाहनचालकांविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साई मोहन देशमुख (१४, रा. साईराम कॉम्प्लेक्स, देवी मंदिरासमोर, मखमलाबाद रोड, पंचवटी), असे अपघातामध्ये ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.
- महत्वाची बातमी: नाशिक शहरात तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने वाहतूक मार्गात बदल
- नाशिक: विक्रीसाठी अवघ्या 10 महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण; संशयिताला अटक
- हृदयद्रावक: नाशिकला पहिल्या मजल्यावरून पडून पावणे दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू…
कमलेश प्रकाश देशमुख (रा. शिंदेनगर, कॅनॉल रोड, पंचवटी) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. १०) साई हा सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सायकलवरून घराकडे जात होता.
त्या वेळी जाणता राजा कॉलनीमध्ये पाठीमागून भरधाव बोलेरो चारचाकी वाहनाने (एमएच- ३९- जे- ३४१४) जोरात धडक दिली. या अपघातामध्ये साईच्या डोक्याला, पोटाला गंभीर जखम झाल्याने त्याच मृत्यू झाला. तर संशयित वाहनचालक अपघातस्थळी न थांबता तेथून पसार झाला. याप्रकरणी संशयित वाहनचालक सम्राट चंद्रकांत पगारे (२७, रा. कळमधारी, ता. नांदगाव) याच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक वाय.एस. माळी हे पुढील तपास करीत आहेत.