नाशिक: बेशिस्त वाहनचालकांमुळे गेला दोघांचा बळी; सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

नाशिक: बेशिस्त वाहनचालकांमुळे गेला दोघांचा बळी; सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या बेशिस्त वाहनचालाकांमुळे एका वृद्धेसह युवकाला आपला जीव हकनाक गमवावा लागला आहे.

याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये वाहनचालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या घटनांमधून नाशिक शहरात अनेक वाहनचालकांची बेशिस्त कायम असल्याचेच अधोरेखित झाले आहे.

गेल्या रविवारी (ता. १३) रात्री अकरा वाजेच्या सुमारास अजय कैलास ढगे (२९, रा. श्री तुलसी हाईटस्‌, रामकृष्णनगर, मखमलाबाद रोड, पंचवटी) हा युवक ॲक्टिवावरून (एमएच १५ एचएन ३९७३) गंगापूर रोडने येत असताना मल्हारखान झोपडपट्टी समोर पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यास कट मारला. त्यामुळे अजय ढगे ॲक्टिवासह दुभाजकावर जाऊन आदळला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी वैभव ढगे यांच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलिसात अज्ञात वाहनचालकाविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरी घटना गेल्या गेल्या १० तारखेला औरंगाबाद रोडवरील जनार्दन स्वामी आश्रमासमोर घडली होती. यात अंजनाबाई रामनाथ काकड (७०, रा. जायगाव, ता. सिन्नर) या रस्ता ओलांडत असताना त्यांना दुचाकीने धडक दिली.

हे ही वाचा:  बारावीची परीक्षा ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून

या अपघातामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, त्यांचे उपचारादरम्यान मृत्यु झाला. रामनाथ काकड (७६) यांच्या फिर्यादीनुसार, आडगाव पोलिस ठाण्यात दुचाकीस्वार (एमएच १५ एफएच ४०७५) संशयित ऋषिकेश भाऊलाल कोकाटे (२०) याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790