नाशिक (प्रतिनिधी): धारणगाव (ता. निफाड) येथे बिंगो रौलेट जुगारातून तरुणाची ३६ लाखांची ८० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या आचल चौरसिया, रमेश चौरसिया (रा. मुंबई), कैलास शहा, गणेश एकनाथ दिंडे (रा. नाशिक) व अमोल कपिल (रा. अकोले, अहमदनगर) यांच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
बापाचे संतापजनक कृत्य; चार वर्षीय पोटच्या मुलीवर अत्याचार, नाशिक शहरातील घटना
झटपट पैसे कमाविण्याच्या नावाखाली तरुणांना बिंगो रौलेट या ऑनलाइन जुगाराचे व्यसन लावले. त्याद्वारे त्यांची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात बिंगो रौलेट जुगाराने पाळेमुळे रुजली आहेत.
नाशिक: शेअर्स घोटाळ्याप्रकरणी नाशिकमधील सहा एजंट्सना अटक
त्यामुळे अनेकांचे कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. लासलगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी शुभम सुनील शेळके (रा. धारणगाव) याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. ऑनलाइन बिंगो गेम खेळल्यास दाम दुप्पट होतात, असे विश्वासाने सांगून, आर्थिक लाभाचे आमिष दाखवत फिर्यादी सुनील शेळके यास ऑनलाईन बिंगो सायबर गेम खेळण्यास भाग पाडले.
नाशिक: रविवार कारंजावरील चांदीच्या गणपती मंदिरात दागिन्यांची चोरी, काही तासांत आरोपी ताब्यात
अमिषामुळे फिर्यादीने वेळोवेळी गणेश दिंडे व अमोल कपिले यांच्या सांगण्यावरून राहुल माणिक गोतरणे, संतोष मोहन चव्हाण यांच्या फोन पेवर ऑनलाईन बिंगो रोलेट सायबर गेम खेळण्यासाठी वेळोवेळी पैसे ट्रान्सफर केले.
यात अंदाजे ३६ लाख ८० हजार रुपये हारल्याने आर्थिक फसवणूक झाली असल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी ऑनलाइन गेम खेळण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी आणि पैशाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.