नाशिक: प्रेयसीसोबत असलेल्या नात्यात आईचा अडथळा ठरवत मुलाने उचललं हे टोकाचं पाऊल !

नाशिक: प्रेयसीसोबत असलेल्या नात्यात आईचा अडथळा ठरवत मुलाने उचललं हे टोकाचं पाऊल !

नाशिक (प्रतिनिधी): प्रेयसीसोबत असलेल्या नात्यात अडथळा ठरत असल्याचे कारण देत मुलाने जन्मदात्या आईला मारहाण करुन घर जाळून टाकल्याचा प्रकार सटाणा तालुक्यात घडला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की श्रीमती बेबी विठ्ठल पवार(वय 45, रा.आराई, ठेंगोडे, ता.सटाणा, नाशिक) या आपला मुलगा अंकुश समवेत वरील पत्त्यावर राहतात.

दि.4 फेब्रुवारी रोजी अंकूश रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दारुच्या नशेत घरी आला आणि स्वत: जेवण वाढून घेतले तेव्हा तो आईला म्हणाला, “तुला नाही जेवायचे का?” त्यावर बेबी पवार म्हणाल्या, तू दारु पिऊन आल्याने मी जेवण नाही करणार. या बोलण्याचा अंकूशला राग आला.

रागाच्याभरात तो आईला म्हणाला तु माझे लग्न मनिषासोबत लावून दे. मात्र, त्या मुलीला दोन मुले असल्याने व ती इतर समाजाची असल्याने बेबी पवार त्यांच्या लग्नाला विरोध करत होत्या.

संतापून अंकूश आईला म्हणाला, तू मनिषा आणि माझ्यात अडथळा झाली आहे. एक दिवस तुझा काटाच काढतो. अशी दमदाटी करुन त्याने बेबी पवार यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली.

नंतर त्याने घरातील दिवा लावून सिलेंडरची नळी मोकळी करत घराला आग लावून टाकली. या आगीत सिलेंडर, शेगडी, चार क्‍विंटल गहू, दोन क्‍विंटल बाजरी, 60 किलो तांदूळ, एलसीडी टिव्ही, होम थिएटर, डिव्हीडी व इतर संसारपयोगी वस्तू तसेच कागदपत्रे जाळून टाकली. बेबी पवार यांच्या फिर्यादीवरुन अंकूशविरोधात सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790