नाशिक: पुलावरुन कार थेट कोसळली नदीपात्रात; 4 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू, सात जण जखमी

नाशिक: पुलावरुन कार थेट कोसळली नदीपात्रात; 4 वर्षांच्या मुलीसह तिघांचा मृत्यू, सातजण गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील नांदगावमध्ये कारचा भीषण अपघात झाला असून इको गाडी पुलावरून थेट नदीत कोसळली. या अपघातात एका लहान बाळासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नांदगावमधील नाग्यासाक्या धरणासमोरील नांदगाव मालेगाव राज्यमार्गावर ही भीषण घटना घडली आहे. मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. नदीवर कठडे नसलेल्या पुलावरुन गाडी थेट नदीत कोसळल्यामुळे तिघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

अपघातात एका लहान बाळासह तिघांचा मृत्यू आहे, तर 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे.

या अपघातातील जखमी आणि मृतांबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.

हे ही वाचा:  नाशिक: खुनातील संशयित 14 महिन्यांनंतर ताब्यात; सिडकोतील 'या' मृत्यूप्रकरणाचा उलगडा !

नेमका कसा झाला अपघात?:
जालना येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असतांना नाशिकच्या नांदगाव-मालेगाव रस्त्यावरील नाग्या-साक्या धरणासमोरील कठडे नसलेल्या पुलावरून इको कार खाली नदीत कोसळली आणि अपघात झाला. भीषण अपघातात एका 4 वर्षीय बालिकेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सातजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास घडला. अपघाताची माहिती कळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी तातडीनं मदत कार्य करत जखमींना रुग्णवाहिकेद्वारे नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णांची परिस्थिती गंभीर असल्यानं प्रथमोपचार करत रुग्णांना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790