नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा Whatsapp Group जॉईन करा..
नाशिक: पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीकडेच मागितली लाखांची खंडणी
नाशिक (प्रतिनिधी): पत्नीने प्रियकराच्या मदतीने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पतीकडे साडेचार लाख रुपये व घर नावावर करून देण्याबाबतची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पतीच्या मोबाईलवरून अनोळखी इसमाचा फोन आला होता. त्याने फिर्यादी यांना “तुमच्या पत्नीचे लग्नानंतर दुसर्या पुरुषाबरोबर अनैतिक संबंध आहेत व त्या दोघांचे 16 अश्लील फोटो, तसेच 8 व्हिडिओ आणि पर्सनल ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे,” असे सांगितले. त्यानंतर अनोळखी इसमाने फिर्यादी पतीस त्याच्या पत्नीचे अश्लील फोटो पाठवून खंडणीची मागणी केली.
ही मागणी पूर्ण न केल्यास हे सर्व अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे, तर फिर्यादीच्या पत्नीने लग्नानंतर परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवून पतीची चांगली प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने संगनमत केले व साडेचार लाख रुपयांची खंडणी मागून घर नावावर करून देण्याची मागणी केली.
हा प्रकार दि. 16 जून ते दि. 2 ऑगस्ट 2022 या कालावधीत घडला. या प्रकरणी फिर्यादी पतीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना तेथे दाद मिळाली नाही. त्यानंतर पतीने न्यायालयात धाव घेतली. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार अंबड पोलीस ठाण्यात आरोपी पत्नी व तिच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790