नाशिक: पत्नीचं प्रेमप्रकरण, पतीनं विचारला जाब; प्रियकराकडून पतीला संपवलं!

नाशिक: पत्नीचं प्रेमप्रकरण, पतीनं विचारला जाब; प्रियकराकडून पतीला संपवलं!

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुन्हेगारी वाढत चालली असताना दुसरीकडे ग्रामीण भागातही गुन्हे वाढत आहेत. गेल्या काही महिन्यात नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण मारहाण, प्राणघातक हल्ला, खून आदी घटना समोर आल्या आहेत. अशातच इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाची घटना समोर आली आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून क्राईम रेट वाढत असून शहरासह जिल्ह्यात वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे ग्रामीण पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. रोजच काहींना काही घटना घडत असल्याने पोलीस यंत्रणा हैराण झाली आहे.

नाशिकला खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांत मारामारी प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अशातच आता खुनाच्या घटना अधिकच घडत आहेत. त्यात सिन्नर, चांदवड, निफाड, इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मागील काही महिन्यात खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे गावातली गावकरी देखील भीतीच्या सावटाखाली आहेत. इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे पोलिसांच्या हद्दीत खुनाची घटना घडली आहे.

बापाचे संतापजनक कृत्य; चार वर्षीय पोटच्या मुलीवर अत्याचार, नाशिक शहरातील घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव अस्वली रोडलगत असलेल्या गरुडेश्वर शिवारात ही घटना घडली. फिर्यादी शांताबाई मधू मुकणे या मूळच्या पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील जोगलवाडी येथील रहिवासी आहेत, मात्र सद्यस्थितीत त्या कामानिमित्त घोटीजवळील वांगेवाडी जवळील वीटभट्टीवर काम करतात. त्यांच्यासोबत मुलगा संपत मुकणे हे देखील वीटभट्टीवर रोजंदारीवर काम करत होते. तर संपत यांची पत्नीचे घोटी येथील शंकर वळवी यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. म्हणून ते दोघे पळून गेले होते. याचा राग मनात धरून अनेकदा संपत मुकणे याने शंकर यास विचारणा केली होती.

मात्र शंकर दळवी हा संपत मुकणे वारंवार उडवाउडवीची उत्तरे देत असे. दरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास हे दोघेही वीटभट्टीवर असताना अचानक संशयित बुधा रतन वळवी आणि शंकर रतन वळवी हे राहणार घोटी येथील असून त्यांनी संपत मुकणे यास मारहाण करण्यास सुरवात केली. दरम्यान दोघा संशयितांनी मुकणे यांना जोरदार मारहाण करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना गरुडेश्वर शिवारात मरिमाता मंदिरालगत फेकून दिले. मारहाणीत मुकणे हे गंभीर जखमी झाल्याने आणि रात्रीची वेळ असल्याने त्यांना वेळेवर रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत. आणि त्यांचा मृत्यू झाला. सकाळी उशिरा येथून जाणाऱ्या गावकऱ्यांना मुकणे हे निपचित पडलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी तात्काळ वाडीवऱ्हे पोलिसांना घंटेची माहिती दिली. वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनचे पीएसआय सुनील बिर्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानुसार संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासचक्रे फिरवत यातील एका संशयितास ताब्यात घेतले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790