नाशिक: न सांगता घरातून निघून जायची म्हणून बापानेच केला अल्पवयीन मुलीचा खून

नाशिक (प्रतिनिधी): नात्याला काळिमा फासणारी घटना सटाणा तालुक्यात घडली. जन्मदात्या बापानेच पोटच्या मुलीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की लखमापूर शिवारातील एका शेतकर्‍याची मुलगी घरात काहीही न सांगता दोन वेळा निघून गेली होती. मुलगी अचानक निघून गेल्यामुळे समाजात अनेक तर्क-कुतर्क व्यक्त होऊन बदनामी झाली, अशी या शेतकर्‍याची भावना झाली.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: गंभीर गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या संशयिताला बेड्या !

मोठी बातमी: उद्यापासून राज्यातील शाळांना उन्हाळी सुट्टी जाहीर, राज्य शासनाचा निर्णय

यामुळे या संतप्त शेतकर्‍याने तरुण वयातील आपल्या मुलीचा गळा आवळून तिला जिवे ठार केले. गळा आवळल्यामुळे गळ्यावर पडलेले काळसर व्रण लवकर लक्षात येऊ नयेत, म्हणून या बापाने मुलीच्या गळ्यावर पॉण्ड्स पावडरचा मारा केला आणि विजेचा शॉक लागून मयत झाली असा देखावा केला.

⚡ हे ही वाचा:  मोठी बातमी! आयटीआर फायलिंगला मुदतवाढ, करदात्यांना मोठा दिलासा

वणी गडावरील सप्तशृंगी देवी मंदिराचा होणार जीर्णोद्धार!

बुधवारी झालेल्या या हत्या प्रकाराची सटाणा पोलिसांना खबर लागताच वरिष्ठ अधिकार्‍यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपीस भा. दं. वि. 302 व 201 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या हत्येचे आणि अटकेचे वृत्त परिसरात पसरताच सर्वत्र खळबळ उडाली. अधिक तपास सटाणा पोलीस करीत आहेत.

⚡ हे ही वाचा:  मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; नाशिक जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ‘यलो अलर्ट’

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here