नाशिक : नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या साईचा धरणात बुडून मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात चार दिवसांपूर्वी कश्यपी धरणात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता.
शुक्रवारी पुन्हा दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणात पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
साई संदिप मोरे असे मयत मुलाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, साई संदिप मोरे वय 16 वर्ष हा शुक्रवारी (29 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास गावाजवळील करंजवण धरणात पोहण्यासाठी गेले होता.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10585,10583,10577″]
या धरणावर तरुणांची आणि मुलांची सध्या मोठी गर्दी बघायला मिळत आहे. परिसरातील अनेक तरुण पोहोण्यासाठी आले होते. साई सुध्दा पोहोण्यासाठी पाण्यात उतरला तेव्हा त्याच्यासोबत अनेक मुलं पोहोण्यासाठी उतरली होती. पोहोत असताना साई खोल पाण्यात गेला. पाण्याचा अंदाज न आल्याने साई बुडायला लागला. मात्र धरणात गर्दी असल्याने साई पाण्यात बुडत असल्याचं कोणाच्या लक्षात आले नाही. तब्बल दोन तासानंतर साई पाण्यात बुडाला असल्याचं लक्षात आलं. यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने साईला पाण्यातून बाहेर काढण्यात आलं. साईला रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. साईने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. या घटनेमुळे करंजवणसह आजूबाजूच्या गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.