नाशिक: नात्याला काळिमा फासणारी घटना! बापानेच केला स्वत:च्या मुलीवर सहा वर्षे अत्याचार
नाशिक (प्रतिनिधी): बापलेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सिडकोत घडली असून, बापाने स्वत:च्याच मुलीवर सलग सहा वर्षे लैंगिक अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पीडित मुलगी ही सिडकोतील डीजीपीनगर परिसरात आई, वडील, लहान भाऊ व बहीण अशा कुटुंबीयांसह राहते.
आरोपी 46 वर्षीय नराधम बाप पत्नी व पीडितेचे भाऊ व बहीण काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर पीडित मुलीशी तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवत असे, तसेच तिच्याशी जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार करीत असे.
तिला वारंवार धमकी देऊन तिच्याशी नराधम बाप अंगलट करीत असे. एवढेच नाही, तर हा प्रकार तू जर कोणाला सांगितलास, तर आपल्या कुटुंबाची बदनामी होईल, अशी धमकी पीडितेला अत्याचार केल्यानंतर देत असे. दि. 1 जानेवारी 2016 ते दि. 26 सप्टेंबर 2022 दरम्यान सलग सहा वर्षे बापाकडून होणार्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून अखेर पीडित मुलीने अंबड पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध अत्याचाराची फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिडकर करीत आहेत.
![]()


