news

नाशिक: नातीला क्लासला सोडून घरी जाणाऱ्या आजोबांचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक: नातीला क्लासला सोडून घरी जाणाऱ्या आजोबांचा दुचाकीच्या धडकेत मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नातीला क्लासला सोडून जाणाऱ्या आजोबांच्या मोटरसायकलला भरधाव वेगात असलेल्या दुचाकीने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले असून नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक : उन्हाच्या तीव्रतेत वाढ; तापमान ३७ अंशांवर, पुढील दिवसांत आणखी वाढीचा अंदाज

या बाबत अधिक माहिती अशी की, गोरखनाथ दादानाथ बुवा (वय 74, रा. डोबी मळा, रोकडोबा मंदिरा मागे, देवळाली गाव, नाशिकरोड) हे काल सकाळी 8 वाजेच्या सुमारास आपल्या नातीला क्लासला सोडून आर्टिलरी सेंटर रोडने अनुराधा टॉकीज समोरून देवळाली गावाकडे जात असतांना बिटकोकडून देवळाली कॅम्पकडे भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीस्वाराने बुवा यांना जबर धकड दिली.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक महापालिकेच्या ग्रीन बॉण्डचे नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग !

धडक इतकी जबर होती की बुवा यांची दुचाकी रस्त्याच्या बाजूला फेकली गेली व त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला. त्या मुळे बुवा रक्ताच्या थारोळ्यात पडून बेशुद्ध झाले. त्यांना जयराम हॉस्पिटलमध्ये उपचार्थ मुलगा निलेश बुवा यांनी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. परेश अलवाणी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: लोककवी वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे देशवंडीत आज ( दि.८) होणार भूमिपूजन

गोरखनाथ बुवा हे देवळाली गावातील नामवंत डॉक्टर के. डी. बुवा यांचे बंधू, देवळाली गाव पंच कमिटी चे सदस्य प्रमोद बुवा यांचे काका तर निलेश आणि किरण यांचे ते वडील होत. त्यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर काल संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790