
नाशिक: धावत्या दुचाकीवर गुलमोहराचे झाड पडल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): धावत्या दुचाकीवर गुलमोहराचे झाड कोसळल्यामुळे एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मुंबई आग्रा महामार्गावर घडली.
नवीन नाशिक येथे सदर प्रकार हा भरदिवसा दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.
सिडको अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकारची ताबडतोब दखल घेतली.
अवघ्या काही मिनिटात सिडको अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले होते.
अधिक माहिती अशी की, लेखानगर येथून आज (दि २७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास जात असतांना गुलमोहोराचे झाड दुचाकीवर कोसळले. या दुर्घटनेत दुचाकीच्या मागे बसलेले अतुल गांगुर्डे (वय ३५, रा. एकलहरे कॉलनी) यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिस व अग्नीशामक दलाला मिळाल्यानंतर घटनास्थळी अंबड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शेख व सिडको अग्नीशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले. अग्नीशामक दलाचे कर्मचारी यांनी रस्त्यावरील झाड काढून वाहतुक पूर्ववत केली.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10561,10548,10551″]
मनपा उद्यान विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा:
मनपा उद्यान विभाग ला धोकेदायक झाड काढण्यासंदर्भात पत्र दिलेले असताना मनपा उद्यान विभागकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे मयताच्या मृत्यूस उद्यान विभाग कारणीभूत आहे. मनपा उद्यान विभागावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी प्रवीण तिदमे यांनी केली आहे.