
नाशिक (प्रतिनिधी): दिवाळीत घरोघरी नवीन कपडे, विविध फराळाचे पदार्थ केले जातात. आपण आपल्या घरातल्या सदस्यांसोबत दिवाळीचा आनंद घेतो. पण समाजातील उपेक्षितांची दिवाळी मात्र दोन वेळच्या जेवणाच्या चिंतेत जात असते.
अशा उपेक्षितांची दिवाळी गोड व्हावी यासाठी विश्व हिंदू सेनेतर्फे ‘दान महोत्सवा’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी ऍड. महेंद्र शिंदे यांनी दिली आहे.
या दान महोत्सावांतर्गत नागरिकांना घरातील वापराविना असलेल्या चांगल्या स्थितीतील कपडे, ब्लँकेट्स, स्वेटर, स्कूल बॅग, पुस्तके, खेळणी, सॉफ्ट टॉय, धान्य, दिवाळीचा फराळ इत्यादी साहित्याचे दान करावे असे आवाहनही ऍड. महेंद्र शिंदे यांनी केले आहे.
दिवाळीच्या आनंदोत्सवात समाजातील गोरगरीब आणि उपेक्षितांचा विचारही मनात येत नाही. अशा घटकांसाठी विश्व हिंदू सेनेच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून दान महोत्सव आयोजित केला जातो. या उदात्त उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
येथे दान करा:
रायगड कॅफे (रिलायन्स पेट्रोल पंपासमोर), ओमकार किरण (मारुती मंदिरामागे, सद्गुरूनगर), प्राची क्लासेस (रघुनंदन रेसिडेन्सी, सोमेश्वर कॉलनी).
अधिक माहितीसाठी या क्रमांकांवर संपर्क करा:
कूलदीप दूबे -९९२२१५६७७४, प्रसाद वाघ – ९०९६१५७११२, प्रशांत सहाणे-८७९६२६२२५४, विकास आव्हाळे- ८४०८०७७७११, शिवम तिवारी -८२०८६४९०२७