
नाशिक: दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून तरुणाच्या डोक्यात फोडली बाटली
नाशिक (प्रतिनिधी): दारू पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून चार जणांनी एका युवकाच्या डोक्यात लाकडी दांडा व काचेची बाटली फोडून बळजबरीने मोबाईल पळवून नेल्याची घटना सातपूर येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अमोल तुळशीराम देवकर (वय ३१) हा युवक त्याचा मित्र गणेश अहिरे याच्याबरोबर जाधव संकुलाकडे जाणार्या रस्त्यावर एका मेडिकल दुकानासमोर थांबून गप्पा मारत होता.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10577,10579,10583″]
त्यावेळी आरोपी अक्षय पाटील, अक्षय गणेश भंगाळे व मनोज लोंढे (तिघेही रा. सातपूर, नाशिक) व कुणाल (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे चार जण तेथे आले. त्यांनी अमोल देवकरकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले; मात्र पैसे देण्यास नकार दिला म्हणून अक्षय पाटील याने त्याच्या डोक्यात लाकडी दांडा मारून दुखापत केली, तर मनोज लोंढे याने देवकर याच्या मित्राच्या डोक्यात काचेची बाटली मारून त्याचा मोबाईल बळजबरीने हिसकावून चोरून नेला.
दरम्यान या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.