Ad: तुमच्या व्यवसायाची जाहिरात पोस्ट करा नाशिक कॉलिंगवर…
नाशिक (प्रतिनिधी): औरंगाबाद रोड वरील सारंगबार येथे दारू घेण्यासाठी आलेल्यांकडे घेतलल्या दारूचे पैसे मागितल्याच्या कारणावरून बार मॅनेजर सह तिघांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे.
याबाबत तिघांविरुध्द आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मितेश मनीलाल राठोड, (वय 24, रा. 4 श्रीहरी पार्क, अमृतधाम, पंचवट) यांनी फिर्याद दिली आहे की,सारंगबार, औरंगाबाद नाका येथे दि.18 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास आकाश नरोडे (वय 24, रा. नाशिक),विकी नरोडे (वय 25, रा. नाशिक), रवी गांगुर्डे (वय 25, रा. नाशिक) अक्षय बेजेकर( वय 26, रा. नाशिक). दिपक बेजेकर, (वय 26, रा. नाशिक) व इतर 3 साथीदार यांनी हे बारमध्ये आले.
त्यांनी यावेळी मधून दारू घेतली. घेतलेल्या दारूचे पैसे मागितले असता कसले पैसे असे म्हणून दारूचे पैसे न देता त्यांनी बारमध्य हाणामारी करण्यास सुरवात केली.
- नाशिक: ट्रकला दुचाकीने मागून दिलेल्या धडकेत ५७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
- नाशिक: तपोवनात 13 वाहनांच्या काचा फोडल्या; दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
- नाशिकच्या पंचवटी भाजी मार्केटमध्ये व्यापार्यावर प्राणघातक हल्ला
यात मितेश मनीलाल राठोड (वय 24, रा. 4 श्रीहरी पार्क, अमृतधाम, पंचवटी), अजय सुरेश पाटील (वय 28, रा. 3673, सावरकर चौक, जुने नाशिक) राजेंद्र विठोबा काकवीपुरे (वय 25, रा. जत्रा हॉटेल मागे, आडगाव शिवार) या तिघांना लोखंडी कोयत्याने मारहाण केली आहे. या मारहाणीत तिघे जखमी झाले आहेत.
याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहायक पोलिस निरीक्षक संतोष शिंदे तपास करत आहेत.