नाशिक: त्र्यंबकरोडवर भरधाव कार दुभाजकावर आदळून २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवरील धामणकर कॉर्नर भागात भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात २३ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला आहे.
ईशान विपीन शुक्ला (रा.स्नेहवर्धनी बिल्डींग,क्लासिक होम अपा सदगुरूनगर,सदाशिवनगर) असे मृत कारचालकाचे नाव आहे.
ईशान मंगळवारी (दि.१३) एमएच १५ ईएक्स ४२४९ या आपल्या कारने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता.
मायको सर्कलकडून जलतरण तलावच्या दिशेने भरधाव जाणा-या कारवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
धामणकर कॉर्नर भागातील एस.के.एम्पायरसमोर कार दुभाजकावर आदळल्याने पलटी झाली. या अपघातात चालक ईशान शुक्ला गंभीर जखमी झाल्याने त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत योगेशकुमार अहिवळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मृत चालकाविरूध्द सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
![]()
नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा...
The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790