नाशिक: “तुला लई माज आला आहे का” म्हणत युवकाला कॉलेजच्या बाहेर टोळक्याची मारहाण

नाशिक: “तुला लई माज आला आहे का” म्हणत युवकाला कॉलेजच्या बाहेर टोळक्याची मारहाण

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधील गुन्हेगारी काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये.

आता एका १८ वर्षीय महाविद्यालयीन युवकाला मारहाण झाल्याची घटना नाशिकमध्ये घड्लीये.

अल्टो कारमधून आलेल्या चार जणांच्या टोळक्याने महाविद्यालयीन युवकास मारहाण केल्याची घटना दिंडोरी रोड येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी श्रेयस बचाराम पाटील (वय १८, रा. वृंदावननगर, म्हसरूळ, नाशिक) हा काल सकाळी १० च्या सुमारास दिंडोरी रोडवरील पीव्हीजी इंजिनिअरिंग कॉलेजच्या गेटबाहेर उभा होता.

👉 हे ही वाचा:  नाशिकमध्ये दोन टोळ्यांतील चकमक प्रकरणी ६ आरोपी पकडले; २ गावठी कट्टे, स्विफ्ट कार जप्त

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10587,10585,10577″]

त्यावेळी संशयित आरोपी तेजस सोनार, रोशन जाधव, शुभम् शिरसाठ व वेदांत बाविस्कर (पूर्ण पत्ता माहीत नाही) हे त्यांच्याकडील एमएच १५ बीएक्स ४८२० या क्रमांकाच्या अल्टो गाडीमधून आले. त्यावेळी तेजस सोनार याने श्रेयस पाटीलची कॉलर पकडून “तुला लई माज आला आहे का? सदर महिलेला फोन केल्यावर तू का बोलतोस? तुझा काय संबंध आहे?” असे म्हणून त्याला शिवीगाळ व मारहाण केली, तर रोशन जाधव याने हातातील लोखंडी कडे फिर्यादीच्या कपाळावर मारून दुखापत केली. यानंतर या चौघांनी श्रेयस पाटील याला बळजबरीने अल्टो गाडीत बसविले व सूर्यवंशी मार्ग येथे नेऊन गाडी थांबविली व गाडीतून खाली उतरवून चौघांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर चौघेही अल्टो कारमध्ये बसून पसार झाले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: रिक्षाचालकाचा 3 प्रवाशांवर प्राणघातक हल्ला; गुन्हा दाखल

दरम्यान या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790