नाशिक: डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनविना औषध विक्री केल्यास मेडिकलचालकांवर कारवाई
नाशिक (प्रतिनिधी): डॉक्टरांच्या लेखी सल्ल्याशिवाय औषधे विक्री केल्यास संबंधित मेडिकलचालकावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला.
पोलिस आयुक्त कार्यालयात जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत अमली पदार्थ कोडिन, अल्प्राझोलन कोरेक्स यांसारख्या औषधी उत्पादने यांची बेकादेशीर खरेदी-विक्रीसंदर्भाने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
अन्न व औषध प्रशासन, पोलिस प्रशासनाकडून थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला.
तसेच डॉक्टर लेखी सल्ल्याशिवाय औषधे विक्री केल्यास संबंधित मेडिकलचालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. पोलिस आयुक्त कार्यालयात जिल्हास्तरीय अमली पदार्थविरोधी कार्यकारी समितीची बैठकीस पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपआयुक्त संजय बारकुंड, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ उत्कर्ष दुधेडिया, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना कुटे, कस्टम विभागाचे सहायक आयुक्त व्ही. के. नाईक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपआयुक्त हर्षवर्धन शिंदे, औषध निरीक्षक महेश देशपांडे, डॉ. संदेश बैरागी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.