नाशिक: ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

नाशिक: ट्रक-मोटारसायकलचा अपघात; दुचाकीधारक गंभीर जखमी

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पेठ रस्त्यावर दिवसेंदिवस अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. पेठ जवळील अपघातग्रस्त वळणावर ट्रकने मोटारसायकलला चिरडले. यात मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाला आहे….

याबाबत अधिक माहिती अशी की, पेठ जवळील अपघातग्रस्त वळणावर पेठकडे जाणाऱ्या मोटरसायकल (क्र. MH 15, EU5913) स्वारास नाशिककडे येणाऱ्या मालट्रक (क्र. MH 15, EE 2772) ने जोरदार धडक दिली. मोटारसायकलस्वार ट्रक व घाटाच्या संरक्षक कठड्यात चिरडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

त्यास प्रारंभी पेठच्या ग्रामीण रुग्णालंयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र दोन्ही पायास अत्यंत गंभीर जखमी झाल्याने नाशिक येथे हलविण्यात आले.

नाशिक-पेठ-गुजरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 848 महाराष्ट्रातून विशेषताः नाशिक, पुणे, नगर येथून मालवाहतूक करणारे ट्रक वापीच्या औद्योगिक वसाहतीशी संबंधित वाहने या मार्गावरुणच मार्गक्रमण करीत असल्याने वाहनांच्या संख्येतही सातत्याने वाढ होत आहे.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याने गिळली विक्सची डबी; श्वास गुदमरला; डॉक्टर देवदूत ठरले, प्राण वाचवले !

दिंडोरी/पेठ हदीतील सावळघाट व कोटंबी घाट यावर दरदिवशी अपघात घडत असताना त्याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने आरटीओ चेकपोस्टजवळ घडलेल्या अपघातास २४ तासाचा अवधी उलटत नाही तोवरच कोटंबी घाटातील त्याच वळणावर मोटरसायकल स्वारास घाटाचा संरक्षक कठड्यावर चिरडून ट्रकने अत्यंत गंभीर जखमी केले. दरम्यान, ऐन पावसाळ्यात नाशिक मनपा हद्दीतील नवीन रस्ता तयार करण्यासाठी रस्ता खोदून टाकल्याने जवळपास ४ ते ५ कि.मी. चे अंतर कापणे अत्यंत जिकरीचे झाले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790