नाशिक: ट्रक उलटून झालेल्या अपघातात 21 भाविक जखमी

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिक (प्रतिनिधी): निफाड तालुक्यातील खानगाव थडी येथील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक उलटल्याने सुमारे २१ पेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

जखमींना निफाड जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, नांदगाव व चाळीसगाव तालुक्यातील भाविक वडांगळी येथील सती माता सामतदादा देवस्थानच्या दर्शनासाठी ट्रकने आले होते. दर्शन आटोपुन सायंकाळच्या सुमारास घराकडे परतत असताना खानगाव थडी येथील वळणावर चालक लक्ष्मण राठोड यांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक क्रमांक एम. एच. १५ ए. जी. ५७८२ थेट रस्त्यालगतच्या त्र्यंबक सोनवणे रा. खामगाव थडी यांच्या शेतात उलटला.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

या अपघातात २१ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जखमींना उपजिल्हा रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.

यामध्ये चालक व एक महिला गंभीर जखमी झाल्याचे डॉक्टरानी सांगितले. जखमीमध्ये महादू राठोड (वय ४९ रा. कासारी तालुका नांदगाव), गोकुळ राठोड वय ३५, मनीष राठोड वय ८९ , काप्पल राठोड वय १०वर्ष ,भाऊलाल राठोड वय २० वर्ष, एकनाथ राठोड वय २० वर्ष सर्व राहणार घोडेगाव तालुका चाळीसगाव, सुरेश जाधव वय २७ वर्षे नांदगाव , कांताबाई चव्हाण वय ६० वर्ष राहणार जातेगाव ,महुबाई चव्हाण वय ६० वर्ष राहणार जातेगाव, सुनीता राठोड वय ३५ राहणार घोडेगाव, सुवर्णा राठोड वय वर्ष १६ वर्षे राहणार घोडेगाव, सविता पवार वय ४० वर्ष ,विमलबाई राठोड वय ३० वर्ष राहणार घोडेगाव, शितल राठोड वय ४५ वर्ष राहणार घोडेगाव धोंडीराम राठोड वय ४० वर्षे राहणार घोडेगाव ,किशोर पवार वय २४ वर्ष राहणार चाळीसगाव, यांच्यावर निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे ही वाचा:  नाशिक जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज; अशी आहे तयारी...

संता राठोड राहणार घोडेगाव ,तालुका चाळीसगाव वाडीलाल राठोड, राकेश राठोड, राहुल राठोड, अनिता राठोड, सर्व राहणार घोडेगाव तालुका चाळीसगाव यांच्यावर खाजगी रुग्णालय उपचार सुरू आहेत .या प्रकरणी सायखेडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790