Ad: तुमच्या व्यवसायाची जाहिरात पोस्ट करा नाशिक कॉलिंगवर…
नाशिक (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्गावर ओझर येथे रविवारी रात्री अपघात झालाय. या अपघातात नाशिक मधील 57 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
अधिक माहिती अशी की, रमेश भगवान राजपूत (वय 57) हे नाशिक मधील गंगापूर रोडवरील श्रीरंग नगर मधील वैष्णवी सोसायटी येथे राहतात. त्यांचा नाशिकमध्ये व्यवसाय आहे.
रमेश राजपूत हे त्यांच्या खाजगी कामासाठी धुळे येथे गेले होते. काम संपवून ते सायंकाळी त्यांच्या स्वतःच्या मोटार सायकलवर नाशिककडे निघाले होते. मात्र रात्री नाशिक जवळ आल्यानंतर त्याचा अपघात झाला.
नाशिक जवळील ओझरला आल्यानंतर ओझर येथील एचएएल समोरील पुलावर त्यांनी गाडी चढवली. मात्र पुलावर रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला मागून धडक दिली गेली. यात रमेश राजपूत हे गाडीवरून खाली पडले. यात रमेश यांना गंभीर मार लागला होता. महामार्ग रुग्णवाहिकेने रमेश यांना जिल्हा शासकीय रुगणालायत उपचाराकरिता दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
- नाशिक: तपोवनात 13 वाहनांच्या काचा फोडल्या; दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न
- नाशिकच्या पंचवटी भाजी मार्केटमध्ये व्यापार्यावर प्राणघातक हल्ला
- नाशिक: मालकाचा विश्वासघात सराफी दुकानातून नोकराने चोरले 14 तोळे सोन्याचे दागिने
महामार्गावर लाईट नसल्याने अंधार होता आणि या अंधारात रस्त्यावर उभी असलेला ट्रक त्यांना न दिसल्याने नसल्याने हा अपघात झाला असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून महामार्गावर प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.