नाशिक जिल्ह्यात शनिवारी (दि. १५ जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १९८९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १४९१, नाशिक ग्रामीण: ३६७, मालेगाव: ५१ तर जिल्हा बाह्य: ८० असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात शनिवारी एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरात हा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७६७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवारी एकूण १४११ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत. कोरोनाची तिसरी लाट सुरु होण्याचे संकेत, सातत्याने वाढती रुग्णसंख्या आणि ओमीयक्राॅन व्हेरिएंटच्या प्रसाराचा वेग पाहता बंद जागेतील पर्यटन स्थळांपाठोपाठ आता खुल्या स्थानांची पर्यटनस्थळेदेखील बंद करा, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक जिल्ह्यातील खुली पर्यटन स्थळेही बंद
नाशिक: वीजजोडणीसाठी दीड हजाराची लाच घेणारा जेरबंद…