नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १८ जानेवारी २०२२) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक जिल्ह्यात मंगळवारी (दि. १८ जानेवारी) एकूण २५८९ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यात नाशिक शहर: १५७६, नाशिक ग्रामीण: ८८१, मालेगाव: ३४, तर जिल्हा बाह्य: ९८ असा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे मृत्यू झालेले दोनही रुग्ण हे नाशिक शहरातील आहेत. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८७७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी एकूण १३७९ रुग्ण कोरोनावर उपचार घेऊन बरे झाले आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: हेल्मेट नसल्यास आजपासून (दि. १८ जानेवारी २०२२) चालकांवर होणार ‘ही’ कारवाई
महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा नाही
![]()


