नाशिक: चारचाकी वाहनाने कट मारल्याने दुचाकीचा अपघात; पत्नीचा मृत्यू, पती जखमी

नाशिक: चारचाकी वाहनाने कट मारल्याने दुचाकीचा अपघात; पत्नीचा मृत्यू, पती जखमी

नाशिक (प्रतिनिधी): महामार्गावरील बळी मंदिर चौकात दुचाकीवर डबलसिट प्रवास करणाऱ्या ५५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सुरेखा शरद कोठावदे (रा. पार्कसाईड होम, बळी मंदिर, आडगाव शिवार) असे मृत महिलेचे नाव आहे. दुचाकीवरून रस्तावर पडल्याने महिलेच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: थंडीचा कडाका वाढला; पारा १२.४ अंशांपर्यंत घसरला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोठावदे या रविवारी (दि.१४) रात्री आपल्या पतीसमवेत दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कोठावदे दाम्पत्य बळी मंदिर चौकातून आपल्या घरी जाण्यासाठी पार्क साईडच्या दिशेने डबलसिट प्रवास करीत असतांना महामार्गाने धावणा-या अज्ञात चारचाकीने दुचाकीस हुलकावणी दिली.

हे ही वाचा:  नाशिक: आयशर ट्रक व रिक्षाचा अपघात; ४५ वर्षीय इसम ठार…

या अपघातात दाम्पत्य रस्त्यावर पडले होते. त्यातील सुरेखा कोठवदे यांना गंभीर दुखापत झाली. तर, पती शरद कोठावदे यांना किरकोळ दुखापत झाली. पती शरद कोठावदे यांनी तत्काळ पत्नी सुरेखा यांना नजिकच्या अपोलो हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी सुरेखा यांना मृत घोषित केले. अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790