नाशिक: गडकरी चौकात पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन गंभीर जखमी
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील गडकरी चौकात आज (दि. २२ मार्च) पहाटे एक भीषण अपघात झाला आहे.
या अपघातात दोन जण जणांची तब्बेत गंभीर असून दोन जण जखमी आहेत.
तर इतर सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत.
याबाबत मुंबई नाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की, गेल्या पाच सहा वर्षांपासून नांदेड जिल्ह्यातील पांचाळ परिवार श्री त्रंबकेश्वरचे दर्शन घेण्याचा विचार करत होते. मात्र गेल्या पाच वर्षे तो योग्य काही आला नाही. मात्र ह्या वर्षी तो योग जुळून आला. सोमवारी पांचाळ परिवार त्रंबकेश्वर येथील दर्शन घेण्यासाठी निघाले. पांचाळ परिवारातील दहा जणांनी क्रूझर गाडी (MH-38. 1916) करून ते सोमवारी नाशिककडे निघाले होते. सोमवारी औरंगाबाद येथून नाशिक कडे आले असता पहाटे (22 मार्च) 3.30 वाजेच्या सुमारास नाशिक शहरातील गडकरी चौकात त्यांचा अपघात झाला आहे.
- Breaking: नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या बदलीचे आदेश…
- नाशिक: अंघोळीच्या गरम पाण्याने भाजल्याने महिलेचा मृत्यू
- नाशिक: पत्नीला आणण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाचा घाला
एका अज्ञात ट्रक चालकाने ओव्हर टेक करत असताना पांचाळ यांच्या गाडीला कट मारला यात पांचाळ परिवाराची गाडी पलटी झाली. गाडीत असलेल्या दहा पैकी दोन जणांची तब्बेत गंभीर आहे. तर इतर किरकोळ जखमी आहेत. राधाबाई दत्तू पांचाळ वय 60 वर्ष राहणार जोमे गाव जिल्हा नांदेड, मानिका दत्तू पांचाळ वय 42 वर्ष राहणार जोमे गाव जिल्हा नांदेड हे दोघे गंभीर आहेत. तर गंगाधर विठ्ठल पांचाळ वय 60 वर्ष आणि गोदाबाई पांचाळ वय 55 वर्ष राहणार बारू जिल्हा नांदेड किरकोळ जखमी आहेत त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गाडीतील इतर प्रवासी किरकोळ जखमी आहेत.