नाशिक: कॉलेजरोड परिसरात चक्कर येउन दुचाकीवरून पडल्याचे २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक: कॉलेजरोड परिसरात चक्कर येउन दुचाकीवरून पडल्याचे २१ वर्षीय युवकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): कॉलेजरोड जवळ दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना चक्कर येवून पडल्याने २१ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. दर्शन योगेश दिघे (मुळ रा.परमोरी ता.दिंडोरी ह.मु. रामचंद्रनगर, म्हसरूळ) असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🔎 हे वाचलं का?:  लाडकी बहीण योजनेबाबत सरकारचा महत्वाचा निर्णय, आदिती तटकरे यांची पोस्ट नेमकी काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिघे रविवारी (दि.२१) मित्राच्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. कॉलेज रोड भागातून दोघे मित्र केबीटी सर्कल मार्गे म्हसरूळच्या दिशेने डबलसिट प्रवास करीत होते. त्यावेळी दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या दर्शनला अचानक चक्कर आल्याने तो धावत्या दुचाकीवरून पडला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: 'सूर्यकिरण एअर शो'मुळे २२ व २३ जानेवारीला 'या' वाहतूक मार्गात बदल

या घटनेत तो जखमी झाल्याने काका विकास दिघे यांनी त्यास अशोका हॉस्पिटल मार्फत जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790