नाशिक: कॅनडा कॉर्नरवर सलूनमध्ये महिलेला मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): कॅनडा कॉर्नर भागात सलूनमध्ये काम करणाऱ्या महिलेस एकाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. अश्लिल हाव भाव करीत संशयिताने पीडितेचा मोबाईल फोडून टाकल्याने तिने पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निरंजन किशोर शिंदे (२५ रा.नाशिक) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी हनुमानवाडीत राहणा-या ३५ वर्षीय पीडितेने तक्रार दाखल केली आहे. पीडिता व संशयित विसेमळा भागातील एका सलूनमध्ये कामास असून बुधवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास दोघांमध्ये किरकोळ वाद झाला.
यावेळी संशयिताने अश्लिल हाव भाव करीत पीडितेस मारहाण केली. या झटापटीत पीडितेचा मोबाईल फोन फोडून संशयिताने नुकसान केल्याने तिने पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार माळोदे करीत आहेत.