नाशिक: काही दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचा खून
नाशिक (प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आली आहे.
म्हसरूळ आडगाव लिंक रोड वर एका खिळ्यांच्या कंपनीमागे हा प्रकार घडला आहे.
प्रवीण गणपत काकड असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
प्रवीण हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे समजते. गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रवीण हा जामिनावर बाहेर आला होता. ह्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सहायक पोलिस आयुक्त मधुकर गावित ,म्हसरूळ पोलिस ठाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत कुमार सुर्यवंशी व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तपास सुरु केला आहे. मात्र हा प्रकार पूर्व वैमनस्यातून घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा नक्की वाचा:
Breaking: मुंबई-नाशिक महामार्गावर स्विफ्ट कार आणि दुचाकीच्या अपघातात एक ठार
नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि. २१ नोव्हेंबर) इतके कोरोना पॉझिटीव्ह; इतके मृत्यू
नाशिकच्या दातार जेनेटिक्सला US FDA चं ब्रेक थ्रू डेझिगनेशन! Breast Cancerचं त्वरित निदान !
अरे व्वा ! ओझर विमानतळावरून आता आंतरराष्ट्रीय उड्डाणे !