नाशिक: कर्जाचे आमिष दाखवून दिला ५ कोटींचा बनावट डीडी, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): नवीन सोलर प्लांट तयार करण्याकरिता कर्ज देण्याचे अमिष दाखवून पंचक जेलरोड येथील एका इसमास पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

🔎 हे वाचलं का?:  नाशिक महानगरपालिका निवडणूक: मतदानाला जातांना ही महत्वाची माहिती जाणून घ्या…

राकेश उत्तम बोराडे (रा. पंचक जेलरोड) यांनी या संदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. बोराडे यांना प्रणव राजहंस (रा. सोनई, जि. अहमदनगर), भूषण बाळंदे (रा. अहमदनगर), मिलिंद मेश्राम (रा. पुणे) सागर वैरागर (रा. सोनई) नितीन हसे (रा. अहमदनगर) व बंटी मेडके या सर्वांनी संगणमत करून बोराडे यांना नवीन सोलर प्लांट तयार करून देतो असे म्हणत त्यासाठी कर्ज देण्याचे आमिष दाखवले.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक: पार्टटाइम जॉबच्या नावाखाली ३६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

बोराडे यांचा विश्वास संपादन केला. पाच कोटी रुपयांचा बनावट डीडी देऊन बोराडे यांची फसवणूक केली. हा प्रकार बोराडे यांना समजल्यानंतर बोराडे यांनी उपनगर पोलीस स्टेशन गाठले व तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी करत आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790