नाशिक: एबीबी सर्कलवर दोन कारचा भीषण अपघात; पाच वर्षीय बालकाचा मृत्यू… सात जण जखमी…

नाशिक: एबीबी सर्कलवर दोन कारचा भीषण अपघात; ५ वर्षीय बालकाचा मृत्यू… सात जण जखमी…

नाशिक (प्रतिनिधी): शहरातील त्र्यंबक रोडवरील एबीबी सिग्नल येथे मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास दोन भरधाव चार चाकी गाड्यांची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला.

या अपघातात एका सहा वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्ह्यात ८ ते १४ एप्रिलदरम्यान ‘सामाजिक समता सप्ताह’ चे आयोजन

या अपघातात सात प्रवासी जखमी झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

मृत मुलाचे नाव राजवीर असल्याचे समजते तर जखमींची नावे समजू शकली नाहीत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की काल रात्री १ वाजेच्या सुमारास त्र्यंबकहून नाशिकच्या दिशेने महिंद्रा झायलो कार (एमएच १५ डीसी ९७४६) व नाशिककडून जाणारी मारुती ब्रिझा कार (एमएच १५ जीएल ३४६१) या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती, की चौकाच्या मधोमध दोन्ही मोटारी उलटल्या आणि त्यामधील प्रवासी बाहेर फेकले गेले. झायलोमधून ५ मुले व ४ जण असे एकूण ९ जण प्रवास करीत होते.

🔎 हे वाचलं का?:  नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी ६७२ कोटींची भांडवली मदत; पुनरुज्जीवनाला गती

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10473,10468,10466″]

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस तसेच १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. या अपघातानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहनातील जखमींना बाहेर काढून त्यांना औषधोपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तसेच या प्रकरणी कृष्णकांत रमेश पठाडे यांच्या फिर्यादीवरून ब्रिझा कारचा चालक गणेशराम अण्णा डावरे यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या अपघाताचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790