नाशिक: एकतर्फी प्रेमातून १९ वर्षीय मुलीचं अपहरण; मुलीच्या आई-वडिलांनी उचललं टोकचं पाऊल
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून 19 वर्षीय मुलीच अपहरण करण्यात आलं होतं. मुलीचं अपहरण झाल्याने तणावाखाली येऊन मुलीच्या आईवडिलांनी रेल्वेखाली उडी मारून आ त्म ह त्या केल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या देवळाली कॅम्प रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.
या घटनेआधी घोटी सिन्नर महामार्गावर आई वडील यांच्या सोबत जात असताना या 19 वर्षीय मुलीचं अपहरण करण्यात आलं होतं. मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार समाधान झनकरसह त्याच्या साथीदारांवर आ त्म ह ते स प्रवृत्त करणे आणि अपहरण करणे यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलिसांकडून मुलीचा आणि आरोपींचा शोध सुरू आहे.
देवळाली कॅम्प परिसरात मुलीच्या आई वडिलांनी रेल्वेखाली उडीत घेत आ त्म ह त्या केली. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार इगतपुरी तालुक्यातील भरवीर येथील निवृत्ती किसन खातळे (४९) आणि त्यांची पत्नी मंजुळा निवृत्ती खातळे (४०) हे आज दुपारी देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक परिसरात आले. रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक 180/01 आणि 180/03 यादरम्यान दुपारी अडीचच्या सुमारास त्यांनी गोदान एक्सप्रेसखाली स्वतःला झोकून दिले.
नाशिक रोड रेल्वे पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची रात्री उशिरा उत्तर तपासणी करण्यात आली. पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप भालेराव आणि शैलेश पाटील तपास करत आहेत.
आरोपीविरोधात अपहरण आणि आ त्म ह त्ये स प्रवृत्त केल्याचा गुन्हा:
दरम्यान मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार सिन्नर पोलीस ठाण्यात रविवारी रात्री उशिरा अपहरण करणाऱ्या समाधान झनकर या तरुणासह त्याच्या साथीदारांवर अपहरण आणि आ त्म ह त्ये स प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपहृत मुलीचा आणि आरोपींचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जात असून त्यासाठी रात्रीतूनच पथके रवाना करण्यात आली आहेत. हे प्रकरण संवेदनशील असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्व बाजूने तपास केला जात आहे.
![]()
