नाशिक: उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात बुलेटस्वार मित्रांपैकी एकाचा मृत्यू; एक जखमी

नाशिक: उड्डाणपुलावर झालेल्या अपघातात बुलेटस्वार मित्रांपैकी एकाचा मृत्यू; एक जखमी

नाशिक (प्रतिनिधी): मुंबई आग्रा महामार्गावर पंचवटी कॉलेजसमोर उड्डाणपुलावर बुलेटला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली.

या धडकेत पाठीमागे बसलेला युवक जागीच ठार झाला तर बुलेट चालकदेखील जखमी झाला आहे.

मुंबई-आग्रा महामार्गाच्या पंचवटी कॉलेजसमोरील उड्डाणपुलावर सदरचा अपघात झाला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पोलिस असल्याची बतावणी करत वृद्धेचे ३.७० लाखांचे दागिने लांबवले

शुभम रामगोपाल पांडे (२५, रा. समाज मंदिरामागे, महालक्ष्मीनगर, अंबड) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

तेजस भिकाजी राणे (रा. कृष्णनगर, कामटवाडे, नाशिक) व शुभम पांडे हे दोघे गेल्या शनिवारी (ता.८) रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास बुलेटने (एमएच १५ एफपी २२९१) महामार्गाच्या उड्डाणपूलावरून प्रवास करीत होते. त्याचवेळी द्वारकाकडून आडगावच्या दिशेने आलेल्या भरधाव वेगातील वाहनाने पंचवटी कॉलेज समोरील उड्डाणपूलावर बुलेटला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघेही मित्र गंभीर जखमी झाले होते. यात पांडे हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक माळी तपास करीत आहेत.

👉 हे ही वाचा:  नाशिक: सोमवारी (दि. १४) विभागीय लोकशाही व महिला लोकशाही दिनाचे आयोजन

मुंबई-आग्रा महामार्गावर दुचाकी, रिक्षा या लहान वाहनांना परवानगी नाही. तसे फलकही लावण्यात आलेले आहेत. तरीही दररोज शेकडो दुचाकीस्वार हे उड्डाणपुलावरून प्रवास करतात. यातून यापूर्वीही अपघात झाले आहेत.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790