नाशिक: आर्थिक विवंचनेतून नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेत आत्महत्या…

नाशिक: आर्थिक विवंचनेतून नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेत आत्महत्या…

नाशिक (प्रतिनिधी): नोकरी गेल्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचना आणि वाढत्या कर्जामुळे आलेल्या नैराश्‍यातून अवघ्या दोन वर्षांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहित दाम्प्त्याने एकत्र गळफास घेत आत्महत्त्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

पाथर्डी फाटा परिसरातील अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीमध्ये सदरची घटना घडली असून, याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे

गौरव जितेंद्र जगताप (29), नेहा गौरव जगताप (23, दोघे रा. अनमोल नयनतारा गोल्ड, हॉटेल सेव्हन हेवनच्या मागे, पाथर्डी फाटा, इंदिरानगर) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे.

⚡ हे ही वाचा:  नाशिककरांनो लक्ष द्या ! शहरातील 'या' वाहतूक मार्गांत अतिशय महत्वाचे बदल !

इंदिरानगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी गौरवचा विवाह नेहा यांच्याशी थाटामाटात झाला होता. गौरव हे सातपूर येथील पेडीलाईट कंपनीत नोकरीला होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच गौरवची नोकरी गेली होती. त्यामुळे तो तणावात होता. नोकरी नसल्याने आर्थिक विवंचना निर्माण होऊन कर्ज वाढल्याचे समजते.

⚡ हे ही वाचा:  नाशिक: जालना येथील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला नाशिकमध्ये अटक

त्यामुळेच दोघांनी संगनमत करुन टोकाचा निर्णय घेतला असावा, असे प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याचे इंदिरानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय बांबळे यांनी सांगितले. याबाबत इंदिरानगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मयत गौरव व नेहा यांच्यावर सोमवारी (ता. १९) दुपारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, मयत गौरवचे वडील हे जिल्हा शासकीय रुग्णालयांतर्गत आरोग्य सेवेत कार्यरत आहेत.

त्या दिवशी नक्की काय घडलं…
रविवारी (ता. १८) सायंकाळी नेहाला तिच्या मावशीने फोन केला होता. मात्र तिने फोन उचलला नाही, म्हणून त्यांनी गौरवचा भाऊ यश जगताप यास फोन करुन गौरव आणि नेहा फोन उचलत नसल्याचे सांगितले. सिडकोतील महाराणा प्रताप चौकात राहणाऱ्या यश हा भाऊ गौरव व नेहा यांना बघण्यासाठी अनमोल नयनतारा गोल्ड सोसायटीतील त्यांच्या घरी पोहोचला. घराचा दरवाजा बंद होता.

⚡ हे ही वाचा:  पोलिसांच्या समर्थनार्थ लावलेली होर्डिंग्ज काढावीत – नाशिक शहर पोलिसांचे नागरिकांना आवाहन

त्यांनी दरवाजा वाजविला, आवाज दिला मात्र, आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे यश व त्याचे काका अरुण गवळी यांनी सोसायटीतील नागरिकांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा गौरव व नेहा या दोघांनी हॉलमधील सिलिंग हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

Loading

नाशिकच्या सर्व अपडेट्ससाठी आमचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा...

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
here