नाशिक: आईने गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून १२ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

नाशिक: आईने गेम खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून १२ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

नाशिक (प्रतिनिधी): आईने गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याचा राग आल्याने येथील ऋषिकेश जालिंदर सुरासे (१२) या सहावीतील मुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली.

या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत.

नैताळेच्या पश्चिमेला नाशिक औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या आदिवासी वस्तीमध्ये जालिंदर सुराशे व पत्नी भारती सुरासे दोन मुलांसह राहतात.

हे ही वाचा:  संतापजनक: नाशिक: दुकानातील वस्तू पडल्यामुळे ८ वर्षीय बालकाला बेदम मारहाण; तिघे ताब्यात

पती-पत्नी दोघे दररोज मोलमजुरी करून कुटूंब चालवितात. त्यांचा मोठा मुलगा सहावी तर दुसरा तिसरीत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात.

आदिवासी वस्तीतील अतिशय गरजू आणि गरीब विद्यार्थी असल्याने त्यांना आदल्या दिवशी शालेय गणवेश देण्यात आला होता. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना १४ ऑगस्टला दुपारी तीनच्या दरम्यान सहावीत शिकणाऱ्या ऋषिकेशने आईकडे गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला. भारती सुरासे यांनी मुलाच्या भविष्याचा विचार करता तू मोबाईलवर गेम खेळू नकोस, अभ्यास कर अस म्हणत नकार दिला.

हे ही वाचा:  नाशिक जिल्ह्यात 1 जानेवारीपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

त्या बाजार करण्यासाठी बाहेर गेल्या असता काही वेळाने भारती सुरासे या घरी आल्या. त्यांना ऋषिकेश दिसेना म्हणून त्यांनी शेजारील खोलीत डोकाऊन बघितलं तर ऋषिकेशने ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे दिसल्याने त्यांनी हंबरडाच फोडला. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसानी घटनेचा पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. निफाड येथे विच्छेदनानंतर ऋषिकेशचा मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात दिला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आदिवासी वस्तीमध्ये राहणारा ऋषिकेश सुराशे हा हुशार विद्यार्थी होता. शाळेतर्फे त्याला गणवेशही देण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापक पांडुरंग कर्डिले यांच्यासह सर्व शिक्षकांनी ऋषिकेशच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांचे सांत्वन केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790