नाशिक: अनैसर्गिक कृत्य केल्याचे उघड होऊ नये म्हणून 9 वर्षीय अपहृत बालकाचा निर्घृण खून!

नाशिक (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यावर अनैसर्गिक कृत्य केल्यामुळे रडू लागलेल्या मुलाने घरी सांगू नये म्हणून या भीतीपोटी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचे हेक्सा ब्लेडने उजवा हात कापून निर्घृण खून केल्याची घटना मनमाड येथे घडली आहे.

या प्रकरणी मनमाड शहर पोलिसांनी अत्यंत जलद तपास करत अवघ्या दोन तासांत सोन्या उर्फ राहुल उत्तम पवार (वय १९ वर्ष) या व्यक्तीस अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बुधवारी (ता. ३०) लोकेश सुनील सोनवणे (वय ९, रा. एकलव्यनगर, आठवडेबाजार, मनमाड) हा सायकल खेळण्याचा आनंद घेत होता.

👉 हे ही वाचा:  नाशिक: पीएफवर व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ नागरिकाची १४ लाखांची फसवणूक

मात्र बराच वेळ झाला तरी मुलगा घरी आला नसल्याने आई-वडील आणि त्यांच्या मित्रांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकेश मिळून आला नाही.

याबाबत तो हरवल्याची लोकेशची आई सोनी सोनवणे यांनी त्याच दिवशी पोलिसांत फिर्याद दिली. सायंकाळी मुलगा आपल्या घरी नसल्याचे पाहून त्याच्या कुटुंबीयांची रात्र अवघड गेली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. १) सकाळी त्याचा शोध सुरू झाला.

दुपारी समजले, की शहरातील फिल्टर हाऊसजवळ एका लहान मुलाला मारून टाकले आहे. मृतदेहाचा शोध घेतला असता, हा बेपत्ता लोकेशच असल्याचे दिसून आले. एक हात करवतीने कापत हाताची करंगळी तोडलेल्या अवस्थेत मृतदेह झाडाझुडपांमध्ये पडला होता. खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. विविध भागातील नागरिक फिल्टर हाऊसजवळ जमा झाले. मुलाचे कुटुंबीय, नातेवाईक आणि त्या भागात राहणारे नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस, लोहमार्ग पोलिस आणि सुरक्षा बलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: १० लाखांच्या रोख रकमेसह फरार झालेला ड्रायव्हर त्याच्या साथीदारासह गजाआड !

बालकाची हत्या झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयित आरोपीला अटक झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका नागरिकांनी घेतली होती. त्यामुळे संशयिताचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. अशात पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत सदर भागातील सीसीटीव्ही तपासणीत अपहरण झालेल्या मुलाचे संशयित व्यक्तीसोबतचे फुटेज मिळून आले. डॉग स्कॉड, फिंगर प्रिन्ट व फॉरेन्सिक एक्स्पर्ट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

👉 हे ही वाचा:  नाशिक: १०८ रुग्णवाहिका चालकांचे बेमुदत धरणे आंदोलन

मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा ज्या व्यक्तीसोबत जाताना दिसत होता त्याचा शोध घेतला. संशयित लोकेशच्या घराजवळ राहत असल्याचे समजल्यावर संशयितास लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, श्री. सरोवर, सुनील पवार, संदीप वणवे, गणेश नरोटे, मुदस्सर शेख, गौरव गांगुर्डे, रणजित चव्हाण, राजेंद्र खैरनार, संदीप झाल्टे, मुरलीधर बुवा, चंदू मांजरे यांच्या पथकाने प्रयत्न केले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790