नाशिक (प्रतिनिधी): तोंड धुण्याचा बहाणा करत नाशिकमध्ये एक आरोपी पोलीस हवालदाराच्या हाताला झटका देऊन फरार झाला आहे.
फरार झालेल्या संशयित आरोपीचे नाव अमोल उर्फ बंटी साळुंखे आहे.
एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी साळुंखे आणि त्याच्यासोबत अजून एका आरोपीला मुंबई नका पोलीस ठाण्यात आणले होते.
या आरोपीला एका गुह्यात मंगळवारी कोर्टात हजार केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. आज गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्याला द्वारका पोलीस चौकीत आणण्यात आले होते. यावेळी तोंड धुण्याचा बहाणा त्याने केला. तोंड धुण्यासाठी बेसिंकजवळ गेल्यानंतर पोलीस हवालदाराच्या हाताला झटका देऊन तो फरार झाला आहे. संशयित आरोपी अमोल साळुंखे यास चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याला नाशिकच्या सेन्ट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र त्याने पलायन केल्याने पोलिसांची भंबेरी उडाली आहे.