नाशिक: अंत्यविधीहून परतणाऱ्या पती पत्नीचा डंपरने धडक दिल्याने मृत्यू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिक-पुणे महामार्गावरील दत्तमंदिर सिग्नल ओलांडून घराकडे जात असताना एका डंपरने दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. बुधवारी (दि. १६ फेवृवारी) ही घटना घडली.
मखमलाबाद येथून नातेवाईकाचा अंत्यविधी आटोपून ते घराकडे परतत होते.
अपघातानंतर डंपरचालक फरार झाला असून उपनगर पोलिस चालकाचा शोध घेत आहे.
अपघाताची भीषणता इतकी होती की पाहणाऱ्या अनेकांना भोवळ आली. मन सुन्न करणाऱ्या या घटनेमुळे चेहेडी परिसरात शोककळा पसरली आहे.
- Breaking: डॉ. सुवर्णा वाजे हत्याकांड, संदीप वाजेचा ‘हा’ साथीदार गजाआड
- नाशिक: सख्खा शेजारीच झाला वैरी- ‘या’ कारणामुळे केला बाप आणि लेकाचा खून
नाशिकरोड येथील दत्तमंदिर चौकातील सिग्नलहून दुचाकीचालक विठ्ठल दादा घुगे(वय ५१) आणि त्यांची पत्नी सुनीता विठ्ठल घुगे (वय ४७) हे दुचाकी (एमएच १५ ईव्ही १८६७)वरुण साई विहार सोसायटी, चेहडी नाका, नाशिकरोड इकडे चालले होते. मात्र पाठीमागून वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्यावरून टायर गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विठ्ठल घुगे यांनी हेल्मेट घातलेले होते, मात्र हेल्मेटचा चक्काचूर झाला. यावेळी उपनगर पोलिसांनी घटनास्थळी डंपरचालकचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल घुगे हे एका मोठ्या खासगी हॉटेल मध्ये कामास होते. त्यांच्या पश्चात स्नेहल आणि श्रावणी ह्या दोन मुली आहेत.