नाशिक: अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवून भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार आणि लाखोंची फसवणूक
नाशिक (प्रतिनिधी): अंगात दैवी शक्ती आल्याचे भासवून भोंदूबाबाने एका महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार नाशिकच्या उपनगर भागात समोर आला आहे.
या भोंदू बाबासह अजून तिघांवर उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा असे या संशयिताचे नाव आहे.
याने एका महिलेवर त्याच्या राहत्या घरी आणि इतर ठिकाणी वारंवार महिलेच्या संमतीविना शाररिक संबंध ठेवले.
जर याबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. आणि अंगात दैवी शक्ती असल्याचे भासवले होते. तसेच घर घेऊन देण्याचे आमिष दाखून महिलेकडून सुमारे 5 लाख रुपये घेऊन तिची फसवणूक केल्याचे पीडित महिलेने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. तर या संपूर्ण घटनेत विष्णू काशिनाथ वारुंगसे उर्फ देवबाबा याची पत्नी मुलगा आणि मुलगी यांचा देखील समावेश असल्याने देवबाबासह त्याची पत्नी सुनीता विष्णु वारुंगसे, उमेश विष्णू वारुंगसे आणि मुलगी अशा चौघांविरोधात उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे.