नाशिकहून गोवा, अहमदाबाद व नागपूरसाठी विमानसेवा सुरु; असे आहे वेळापत्रक

नाशिकहून गोवा, अहमदाबाद व नागपूरसाठी विमानसेवा सुरु; असे आहे वेळापत्रक

नाशिक (प्रतिनिधी): तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ओझर विमानतळावरुन इंडिगो या विमान कंपनीच्या गोवा, अहमदाबाद आणि नागपूर येथील विमानसेवेला बुधवारी (ता.१५) थाटात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी ३६६ प्रवाशांनी या सेवेला प्रतिसाद दिला. या विमानसेवेला यापुढेही उत्तम प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.

नाशिकवरून सध्या स्पाईसजेट कंपनीची नाशिक- नवी दिल्ली आणि नाशिक-हैदराबाद या शहरांसाठी सेवा सुरू आहे. यात इंडिगो कंपनीची भर पडली असून बुधवारी तीन शहरांची सेवा सुरु झाली.

असा झाला प्रवास: इंडिगोने सुरु केलेल्या विमानसेवेच्या पहिल्याच दिवशी नाशिकहून गोव्याला ६१ प्रवासी गेले. तिकडून ५५ प्रवासी नाशिकला आले. अहमदाबादला ६६ प्रवासी गेले आणि तितकेच प्रवासी परतले.

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिकहून नागपूरला ५३ प्रवासी रवाना झाले आणि ६५ प्रवासी तिकडून नाशिकला आहे. पहिल्याच दिवशी १८० प्रवासी नाशिकहून दुसऱ्या शहरात पोहोचले आणि १८६ प्रवासी नाशिकला आले. प्रवाशांचा असाच प्रतिसाद मिळाल्यास नाशिकची विमानसेवा अधिक विकसित होईल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

इंडिगो कंपनीचे वेळापत्रक:

शहराचे नाव… सुटण्याची वेळ… पोहचण्याची वेळ…: हैदराबाद….सकाळी ७.१०……सकाळी ९.१० (नाशिक), नाशिक….सकाळी ९.३०….सकाळी ११.२० (गोवा), गोवा…..सकाळी ११.४०….दुपारी १.३५ (नाशिक), नाशिक….दुपारी १३.५५….दुपारी ३.२०(अहमदाबाद), अहमदाबाद….दुपारी ३.४०….सायंकाळी ५.०५(नाशिक), नाशिक….सायंकाळी ५.२५….रात्री ७.१५(नागपूर), नागपूर…..रात्री ७.३५…..रात्री ८.२५(नाशिक), नाशिक….रात्री ८.४५…. रात्री ११.४०(हैदराबाद).

इथे करा तुमचं टिकिट बुक: https://www.goindigo.in/

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790