नाशिकला खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांत मारामारी प्रकरणी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकला खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांत मारामारी प्रकरणी गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): विद्यार्थ्यास मारहाणीची घटना काठे गल्ली परिसरात घडली असून, वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तक्रारदार भारती नारखेडे काठे गल्लीत दहावीचा खासगी क्लास चालवतात. रविवारी (ता. १६) सकाळी त्यांच्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा त्यांना फोन आला. ‘टाइमपास क्लास चालवता, माझ्या मुलास मारहाण झाली’, असे म्हणत तक्रारदारांशी फोनवर वाद घातला.

हे ही वाचा:  नाशिक: भरधाव दुचाकीच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू

बापाचे संतापजनक कृत्य; चार वर्षीय पोटच्या मुलीवर अत्याचार, नाशिक शहरातील घटना

त्यानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी तक्रारदार यांच्या घरी येऊन वाद घातला. संशयितांनी त्यांच्या मुलाबरोबर वाद झालेल्या विद्यार्थ्यांस व त्याच्या पालकांनाही तक्रारदार यांच्या घरी बोलावण्यास सांगून त्यांच्याशीही वाद घातला.

हे ही वाचा:  नाशिक शहरातील 'या' वाहतूक मार्गात ९ नोव्हेंबरपर्यंत महत्वाचा बदल !

नाशिक: शेअर्स घोटाळ्याप्रकरणी नाशिकमधील सहा एजंट्सना अटक

‘त्या दुसऱ्या विद्यार्थ्यास आमच्या ताब्यात द्या, त्यास मारून टाकू’, अशी धमकी दिली. याप्रकाराबाबत तक्रारदार नारखेडे यांच्या मुलीने पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद सोडविण्याचा प्रयत्न केला.

नाशिक: बिंगो रौलेट जुगारातून 36 लाखांची फसवणूक

संशयितांनी त्यांच्याही बरोबर वाद घालत धक्काबुक्की केल्याचे समजते. पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त बोलवत सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. भारती नारखेडे यांच्या फिर्यादीवरून संशयित गणेश बटवाल, रोहिणी बटवाल, प्रतिभा जुन्नरे, तृप्ती जुन्नरे, तृप्तीची व वेदांत बटवाल अशा पाच जणांविरुद्ध भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (गुन्हा रजिस्टर क्रमांक: 0134/2023). पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790