नाशिकरोड, गोविंदनगर, महात्मानगर मार्गे निमाणी चक्री बससेवा सुरू
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकरोड, गोविंदनगर, महात्मानगर, राजीव गांधी भवन मार्गे निमाणी चक्री बससेवेला मंगळवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला.
गोविंदनगर, कर्मयोगीनगरच्या रहिवाशांनी समाधान व्यक्त करीत या सेवेचे उत्स्फूर्त स्वागत केले.
पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
निमाणी येथून सकाळी पावणेसहा वाजता नाशिकरोडला पहिली बस निघाली.
सकाळी ९ वाजता गोविंदनगर येथे रहिवाशांनी बसचे स्वागत केले. पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले. महिलांनी बसचे पूजन केले. पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गोविंदनगर, मुंबई नाका, द्वारका, नाशिकरोड, जुने सिडको, महात्मानगर, सिटी सेंटर मॉल, कॉलेजरोड, गंगापूररोड, कर्मयोगीनगर, तिडकेनगर, कालिका पार्क, जगतापनगर, उंटवाडी आदी भागातील नागरिक, विद्यार्थी यांची गैरसोय दूर झाल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. इंधनाच्या वाढत्या दरामुळे स्वत:चे वाहन नेणे, तसेच रिक्षा-टॅक्सीचे भाडे वाढल्याने प्रवास महागला आहे. याशिवाय शहरात पार्किंगची समस्याही मोठी आहे. यामुळे या बससेवेचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बससेवेच्या स्वागतावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, रवींद्र सोनजे, प्रभाकर खैरनार, दिलीप दिवाणे, अशोक पाटील, धवल खैरनार, संगिता देशमुख, वंदना पाटील, प्रतिभा पाटील, संध्या छाया ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देवरे, राधाकृष्ण जाधव, कृष्णा विसाळे, गोविंदनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे भालचंद्र रत्नपारखी, ओमप्रकाश शर्मा, अशोक पालवे, बाळासाहेब देशमुख, प्रमिला देशमुख, मंगला खैरनार, ताराबाई कासार, प्रतिभा जुन्नरे, कौशल्या पाचपुते, प्रेमला हिरण, आत्माराम शेलार, शरद भुसे, प्रकाश नाईक, प्रदीप जाधव, दिलीप निकम, सुदाम निकम, रामदास वसाणे, प्रशांत घगाळे, प्रकाश पवार, अशोक देवरे, डॉ. प्रकाश हिरण, अशोक कुलकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक हजर होते.
नाशिकरोडहून निमाणीसाठी सुटणार्या बसची वेळ : सकाळी ६, ७, ८.२०, ९.२०, १०.५०, दुपारी ३.५०, ४.५०, सायंकाळी ६.३०, ७.१० व रात्री ९.४५ वाजता.
निमाणीहून नाशिकरोडसाठी सुटणार्या बसची वेळ : सकाळी ५.४५, ७.१०, ८.१०, ९.४०, १०.४०, दुपारी २.४०, सायंकाळी ५.२०, ६, ७.४० व रात्री ८.२० वाजता.