नाशिकमध्ये सीबीआयच्या पहिल्याच कारवाईत GSTचा बडा अधिकारी जाळ्यात
नाशिक (प्रतिनिधी): आदिवासी विकास विभागातील कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांना तब्बल 28 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याचे प्रकरण ताजे असताना आता केंद्रीय अन्वेषण ब्युरो म्हणजेच सीबीआयनेही नाशिकमध्ये मोठी कारवाई केली आहे.
नाशिकमध्ये जीएसटी विभागाचे अधीक्षक सीबीआयच्या जाळ्यात सापडले आहेत. नाशिकच्या कार्यालयामधून चंद्रकांत चव्हाणके यांना अटक करण्यात आली आहे.
सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नाशिकमधील वस्तू व सेवा कर (GST Office) विभागाचे कार्यालय आहे.
एक राज्य सरकारचे आहे तर दुसरे केंद्र सरकारचे. यातील केंद्र सरकारच्या सीजीएसटी कार्यालयावर सीबीआयने धाड टाकली. या कारवाईमध्ये सीजीएसटी विभागाचा अधीक्षक चंद्रकांत चव्हाणके हाती लागला आहे. या सुप्रिटेंडंटने नक्की किती लाच घेतली, कुठे घेतली, कुणाकडून आणि कशासाठी घेतली हे अद्याप समोर आलेले नाही. सीबीआयचे पथक अधिक चौकशी करत आहेत.