नाशिकमध्ये बस पेटली; पहाटे प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला, नक्की काय घडलं?

नाशिकमध्ये बस पेटली; पहाटे प्रवासी गाढ झोपेत असतानाच काळाचा घाला, नक्की काय घडलं?

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक औरंगाबाद मार्गावर नांदूर नाक्याजवळ (मिरची हॉटेल) खासगी बसला लागलेल्या आगीत 10 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 29 प्रवासी जखमी झाले आहेत..

पहाटे पाच वाजता बस व ट्रेलरमध्ये हा अपघात झाला.. त्यानंतर बसने पेट घेतला.. सदर बस ही यवतमाळकडून मुंबईकडे जात होती..बसमध्ये 30 ते 40 प्रवासी होते..

पहाटेच्या सुमारास बसमधील अनेक प्रवासी झोपेत असतानाच काळाने घाला घातला. खाजगी बसला आग लागून 10 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

ही आग एवढी भीषण होती की काही वेळात झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. बसमधील काही प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही आगीतच होरपळले. नेमकं काय घडलं?

हे ही वाचा:  नाशिक: सणांच्या पार्श्वभूमीवर ६२१ सराईत गुन्हेगारांवर कारवाई, ११ स्थानबद्ध

10 जणांचा मृत्यू, 29 प्रवाशी जखमी:
नाशिकमधील बस आग दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती जिल्हाधिकारी गंगाधरन डी यांनी दिली आहे. तर 29 प्रवासी जखमी असून यापैकी एकजण गंभीर जखमी असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयातून दुसरीकडे पुढील उपचारांसाठी हलवण्यात येणार असल्याचे सांगितले.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोहचले असून पाहणी केली जात आहे. पोलिस उपायुक्त अमोल तांबे यांनी या अपघाताची पुष्टी करत माहिती दिली आहे की, ”या आगीत होरपळून काही जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.”

बसचा अक्षरश: कोळसा, अनेक प्रवाशांचा मृत्यू:
नाशिक शहरातील औरंगाबाद रोडवरील हॉटेल मिरची चौकात असलेल्या चौफुलीवर ही भीषण घटना घडली आहे. मिरची हॉटेल परिसरात चिंतामणी ट्रॅव्हलच्या बसने पेट घेतल्याने बसमधील काही क्षणात जळून खाक झाली आहे. आग एवढी भीषण होती की काही वेळात आगीत झालेल्या स्फोटाने परिसरातील नागरिक खडबडून जागे झाले. चिंतामणी ट्रॅव्हलची ही यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेली बस होती. दरम्यान नाशिकमधून ही बस मुंबईकडे मार्गस्थ झाली असतांना पहाटे साडे चार ते पाच वाजेच्या सुमारास ही घडल्याचे प्रत्यक्ष दर्शनी यांनी सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: चिमुकल्याचा खून करणाऱ्या संशयिताला कोठडी

नाशिक सिटी लिंक बसची मदत:
नाशिक सिटी लिंक बस सेवेच्या माध्यमातून जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जखमींवर उपचार सुरू झाले आहेत. प्रवासी गाढ झोपेत असताना अचानक आवाज झाला आणि सर्व प्रवाशी जागे झाले, मात्र बसच्या अनेक भागात आग पसरली होती. अनेकांनी खिडकीतून उड्या मारल्या, तर काही जणांना आपला जीव गमवावा लागला.

हे ही वाचा:  नाशिक: चोरीच्या ४ मोटार सायकलसह २ चोरटे गजाआड

पोलीस यंत्रणा खडबडून जागी, अग्निशमन दल घटनास्थळी:
दरम्यान स्थानिक नागरिकांना बस जळत असल्याचे त्यांनी घटनेची पोलिसांसह अग्निशमन दलाला कळविली. त्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन ते चार वाहने तसेच चार ते पाच रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. साधारणपणे अर्धा तासाहून अधिक काळ पेटलेली बस विझवण्याचा प्रयत्न सुरू होता. बस पेटल्यानंतर ज्या प्रवाशांना बसमधून खाली उतरता आले, त्यांनी उड्या मारल्या तर आगीमुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला.

दरम्यान या घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला असून, अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790