नाशिक (प्रतिनिधी) : आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, सिन्नर या शहरांमध्ये कोरोनाबाधीतांच्या वाढत्या संख्येवर अटकाव आण्यासाठी लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याप्रमाणेच घोटीमध्ये सुद्धा २२ मार्च पासून आतापर्यंत ४ वेळा लॉक डाऊन करण्यात आला होता. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता येत्या सोमवार (दि.२७) पासून पुन्हा १४ दिवसांसाठी लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. तहसीलदार कार्यालयात प्रशासन, व्यापारी आणि लोकप्रतिनिधींच्या गुरुवारी (दि.२३) झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाची साखळी तोडण्याकरिता नाशिकमधील विविध शहरांमध्ये लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा वाढता प्रसार बघता घोटी ग्रामपालिकेने सोमवार (दि.२७) पासून पुन्हा 14 दिवसांचा संपूर्ण लॉक डाऊन घोषित केला आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवण्यात आली आहेत. आजपासून तीन दिवस शहर खुले करण्यात येणार असून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा साठ करून ठेवण्याचे आवाहन ग्रामपालिकेकडून करण्यात आले आहे.