नाशिक (प्रतिनिधी): शहरातील शालीमार परिसरातील शहाजहानी पीरजादा कब्रस्तानला लागून असलेल्या अनधिकृत दुकानांवर अतिक्रमण विभागाने आज सकाळपासून पोलिसांच्या बंदोबस्तात हातोडा फिरवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी अतिक्रमण काढतांना व्यावसायिक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले…
नाशिक शहरातील महत्वाच्या मार्गावर ठाण मांडलेली अनधिकृत बांधकामे तसेच अतिक्रमण काढण्याचा निर्णय महापालिका आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी घेतला आहे. त्यानुसार आज सकाळी साडेसहा वाजेपासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली.
नाशिक: फोटोग्राफर्सना मारहाण करून आलिशान कारसह कॅमेरे पळवले
बुधवारी सायंकाळी मनपा प्रशासनाने गाळे धारकांना सुचना देत सकाळी अतिक्रमण मोहीम राबवली जाणार असल्याची सूचना दिली होती. रात्रभर गाळे धारकांची साहित्य हलविण्यासाठी लगबग सुरु होती. सकाळी सहा वाजेपासून मनपाच्या अतिक्रमण विभागाने पोलीस ताफ्यासह कारवाईला सुरुवात केली. यात जेसीबीच्या माध्यामातून सुमारे पंचवीस ते तीस पत्र्याचे शेड उध्वस्त केले. या शेड शहाजहानी पीरजादा कब्रस्तानच्या जागेत होत्या, त्यालगत आठ ते दहा गाळे झोपडपट्टी विभागात होते. याठिकाणच्या पक्क्या बांधकामातील व्यावसायिक वापराचा भाग मनपाने तोडला.
नाशिक: जुनी कुरापत काढून चार ते पाच जणांच्या टोळक्याचा युवकावर जीवघेणा हल्ला Video
प्रत्यक्षात शालिमारचा परिसर हा गेल्या काही वर्षांत अतिक्रमणांनी झाकलेला दिसत होता. तसेच येथील कालिदास कलामंदिर रस्त्याच्या कडेला कपडे, शूज यासह इतर दैनंदिन साहित्याची अनेक दुकाने थाटण्यात आली होती. त्यामुळे महिला वर्गासह तरुण तरुणीची नेहमीच गर्दी होत असायची. एका बाजूला रिक्षा थांबा दुसऱ्या बाजूने व्यावसायिक गाळ्यांचे फुटपाथवरील अतिक्रमण यामुळे सर्व सामान्यांना पायी चालणे कठीण झाले होते. आता अतिक्रमण काढण्यात आल्याने हा परिसर मोकळा श्वास घेतांना दिसणार आहे.
नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कळस; नाश्ता केला, पैसे मागितले तर स्वीट्स मालकाला मारहाण.. Video
दरम्यान शालिमार हा परिसर गेल्या काही वर्षांत अतिक्रमणांनी झाकोळला होता. याच परिसरात कवी कालिदास नाट्यगृह असून समोरील बाजूस बीडी भालेकर मैदान आहे. तर त्यालाच लागून शहाजहानी पीरजादा कब्रस्तान आहे. मात्र या कब्रस्तानच्या जागेवर अनधिकृत बांधकाम तसेच दुकाने थाटण्यात आली होती. कपडे, शूज इतर दैनंदिन साहित्याची दुकाने असल्याने रोजच या मार्गावर गर्दी होत असते. त्यामुळे महिला वर्गासह तरुण तरुणीची नेहमीच वर्दळ असल्याने अनेकदा वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत असे. त्यामुळे महापालिकेने या अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज सकाळपासून अतिक्रमण काढण्यास सुरवात केली आहे.