Live Updates: Operation Sindoor

नाशिकच्या अनेक लोकांचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या बिंगो रोलेट जुगाराच्या “या” सूत्रधाराला अटक

नाशिकच्या अनेक लोकांचं आयुष्य उद्धवस्त करणाऱ्या बिंगो रोलेट जुगाराच्या “या” सूत्रधाराला अटक

नाशिक (प्रतिनिधी): बिंगो रोलेट जुगाराच्या माध्यमातून राज्यातील अनेकांची फसवणूक करणाऱ्या बिंगो रोलेट किंग कैलास शहा यास नाशिक ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे.

संशयित कैलास शहा ग्रामीण पोलिसांनी शहरातून अटक केली.

या जुगाराचा मुख्य सूत्रधारालाच पोलिसांनी गजाआड केल्याने फसवणूकीची अनेक गुन्ह्यांची उकल होणार आहे.

वावी ठुशी (ता.निफाड) येथील रामराव रसाळ (वय ३७) या तरुण दलालाच्या माध्यमातून संशयित कैलास शहा (वय ३२, रा. गंगापूर रोड) आणि प्रितम गोसावी (पिंपळगाव बसवंत) यांच्या संपर्कात आला होता.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10508,10506,10499″]

संशयित आरोपी यांनी रामराव यांचा विश्‍वास संपादन करत संशयित शहा यांनी रामराव रसाळच्या मोबाईल कमांकावर बिंगो रौलेट फनगेम नावाचे अॅप्लिकेशनची लिंक सेंड करून ती डाऊनलोड करून देत ऑनलाईन बिंगो रौलेट जुगार खेळण्यासाठी लागणारा मुख्य आयडी आणि पासवर्ड पाठवुन ०१ पॉईंटला ३६ रूपये या दराने पैसे मिळतील असे सांगुन फिर्यादीस आरोपींनी स्वतःचा आर्थिक फायदा होणे करीता बिंगो रौलेट जुगार खेळण्यास भाग पाडले. त्यानंतर या दोघा संशयित यांनी रसाळ यांची तब्बल ४५ लाख ४४ हजार ३१५ रुपयाची आर्थिक फसवणूक केली. त्यानंतर ही रक्कम अदा करण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला.

👉 हे ही वाचा:  नाशिक: दोन दुचाकीचोर सात दुचाकींसह जाळ्यात

रामराव रसाळ यांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी याप्रकरणात तरूणाची झालेली फसवणूक लक्षात घेता बिंगो रोलेट या जुगाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पथकास मार्गदर्शन करत ह्यातील संशयित यांना अटक करण्यासाठी नियोजन आखले. त्यानंतर या जुगाराचा किंग कैलास शहा हा नाशिक शहरात असल्याची माहिती त्यांना मिळताचा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने शहरातून संशयित कैलास जाधव यास अटक केली. यातील दुसरा संशयित प्रितम गोसावी मात्र फरार झाला आहे. संशयित शहा यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

👉 हे ही वाचा:  नाशिक: केटीएचएम कॉलेज येथे आज (दि. ७ मे) झालेल्या मॉक ड्रिलची क्षणचित्रे…

अनेक तरुणांच्या आत्महत्या:
संशयित कैलास शहा याने अनेक तरुणांना या बिंगो रोलेट जुगारात पैशांचे आमिष दाखवून खेळण्यास भाग पाडले होते. यामुळे झालेल्या फसवणुकीतुन तरूणांचे आणि विद्यार्थी यांचे मोठे आर्थिक व कौटुंबिक नुकसान होत असुन आत्महत्याही केल्या आहे, तसेच काही तरुण जिंकण्याच्या अमिषानं कर्जबाजारी झाले आहे. आपली घरे, दुकान मोटर वाहने, स्थिर स्थावर मालमत्ता विक्री करावी लागली आहे.

👉 हे ही वाचा:  भारताने जैसलमेरमध्ये पाकिस्तानी फायटर जेट पाडले; एक पाकिस्तानी पायलट भारतीय सैन्याच्या ताब्यात !

कैलास शहावर जिल्ह्यात १२ गुन्हे:
बिंगो रोलेट जुगाराचा मुख्य सूत्रधार कैलास शहा यांच्यावर शहर व ग्रामीण भागातील नाशिक तालुका, गंगापूर, भ्रदकाली, पंचवटी पोलीस ठाणे, पिंपळगाव. त्र्यंबकेश्‍वर,ओझर, दिंडोरी या सर्व पोलीस ठाणेमध्ये एकूण १२ गुन्हे दाखल आहे. यासह इतर जिल्ह्यात देखील कैलास शहावर फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790